Monday, 24 October 2011

Nagpur hukka Parlour

परवानगी नसतानाही सर्रासपणे हुक्का आणि स्नूकर पार्लर चालविणार्‍यांवर आज शहर पोलिसांनी धाडी टाकल्या. त्यामुळे संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अनेकांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केल्याची माहिती आहे. कारवाईदरम्यान अनेकांकडे परवानगी नसल्याचे समोर आले.
कुश कटारिया हत्याकांडाचा आरोपी आयुष पुगलिया यालाही स्नूकरचे वेड होते. हुक्का पार्लरवर सरकारने बंदी घातली आहे. परंतु तरीही ते सर्रासपणे सुरू होते. शहरात ११ हुक्का पार्लर आणि २४ स्नूकर पार्लर आहेत. गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने सायंकाळी पार्लरवर धाडी टाकण्यास सुरुवात केली. सदर, अंबाझरी आणि नंदनवन पोलीस ठाण्यांतर्गत ११ पुल आणि १२ स्नूकर पार्लरवर धाडी टाकल्या. हुक्क्याशिवाय जेवणाचीही व्यवस्था होती. अनेकांकडे दुकानाचा परवाना होता. परंतु जेवणाचा परवाना नव्हता. त्याआधारे पोलिसांनी संचालकांविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई केली. युवकांची या ठिकाणी गर्दी असते. तेथे हजारो रुपये उधळले जातात. गुन्हेगारांचेही हे आकर्षणाचे केंद्र आहे.

2 comments:

  1. please arrest...and give hard punishment...thank nagpur guru for awareness to the people.

    ReplyDelete
  2. sab paise ka khel hai...

    ReplyDelete