'मला जाऊ द्या ना घरी. आता वाजले की बारा' म्हणत 'थर्टी फस्र्ट' साजरा करून २0११ हे वर्ष इतिहासजमा झाले. मोबाईलच्या स्क्रीनवर 00.00 ही वेळ दिसताच आबालवृद्धांनी २0१२ चे धडाक्यात स्वागत केले. विशेष म्हणजे, सायंकाळपासूनच रिमझिम पावसाची पावलं उपराजधानीच्या रस्त्यांवर खेळून गेली होती. त्यामुळे, रस्त्यावरची गर्दी किंचित कमी झाली तरी वातावरणात खराखुरा नवेपणा पसरून गेला.
दुपारपासूनच तरुणांचे मोबाईल एंगेज झाले होते. कुठे भेटायचे, काय करायचे, काय घ्यायचे आणि कुणाला काय द्यायचे.. मोबाईल टू मोबाईल 'प्लॅनिंग' पक्के झाले होते. रात्री, फुटाळा तलाव, शंकरनगर, धरमपेठ, गोकुळपेठ, सदर बाजार, वर्धमाननगर, व्हेरायटी चौक अशा मोक्याच्या ठिकाणी तरुणांचे जत्थे जमले. दरवर्षीच्या अनुभवांवरून पोलिसांनीही अनेक ठिकाणी शिपाई तैनात केले होते. शंकरनगर ते लॉ कॉलेज चौकापर्यंतच्या रस्त्यांवरील छोट्या छोट्या रस्त्यांवरील वाहतूक सायंकाळपासूनच अडविण्यात आली होती
No comments:
Post a Comment