Sunday 26 February 2012

Nagpur school MONTFORT bus

स्कूल बसच्या वाढत्या अपघातांनी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. बसचालकांवर कोणाचाही दबाव नाही. दारू पिऊन ते बस चालवितात. सर्रास विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे या स्कूल बस आता यमदूत झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी पुन्हा छत्रपती चौकात मॉण्ट फोर्ट शाळेच्या मद्यधुंद बसचालकाने हैदोस घातला. यात ग्रंथपाल गंभीर जखमी झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, बस रस्ता दुभाजकावरून उसळली आणि उलटली. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रतापनगर पोलिसांनी बसचालकाला अटक केली आहे. राजू कुंभरे (२८)रा. इसासनी,असे आरोपीचे नाव आहे. रमेश देशपांडे (५२) रा. नंदनवन, असे जखमीचे नाव आहे. देशपांडे लकडगंजमधील विनायकराव देशमुख हायस्कूलमध्ये गं्रथपाल आहेत. 
सायंकाळी एमएच-४0- एन- ५३८0 या क्रमांकाची बस छत्रपती चौकाकडून मनीषनगरकडे जात होती. छत्रपती चौक पार करीत नाही तोच बसने स्कूटीला धडक दिली. रमेश आणि रेणुका खाली पडले. बसचालक राजूने बस मागे घेतली. त्यामुळे चाक रमेश यांच्या पायावरून गेले. ते गंभीर जखमी झाले. राजू दारू पिऊन होता. त्यामुळे त्याने बसचा वेग वाढविला. 
एका बसला धडक दिली. त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. रस्ता दुभाजक पार करून बस उलटली. सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नव्हते. या मार्गावरून त्या वेळी कोणतीही गाडी गेली नाही. अन्यथा भीषण घटना घडली असती. घटनेनंतर क्लीनर फरार झाला. 
राजूही फरार होण्याच्या तयारीत होता. या भागात तैनात वाहतूक पोलिसांनी त्याला पकडले. घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखा आणि प्रतापनगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. चालकाला अटक केली. क्रेनच्या मदतीने बस बाजूला करण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
News Source : http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=21

No comments:

Post a Comment