Monday 12 March 2012

Nagpur Collage School news


गजानन प्रसाद उच्च प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन
नागपूर - गजानन प्रसाद ग्रामीण उत्कर्ष शिक्षण संस्थेद्वारा संचालित गजानन प्रसाद उच्च प्राथमिक शाळा व बालवाडीत स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. उद््घाटन मेजर जकाते हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक मधुसूदन मुळे यांच्या हस्ते झाले. पाहुणे सूर्योदय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँण्ड टेक्नालॉजीचे अध्यक्ष दीपक चाफले, पी.एम.बी.एस. कॉलेजचे संचालक डोंगरे, संत गजानन महाराज नागरी सह. पत संस्थेचे अविनाश तागडे, मुख्याध्यापिका सीमा ठोंबरे आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव मोंढे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सीमा ठोंबरे यांनी केले. आभार परमानंद लोणारे यांनी मानले. 
दुसर्‍या दिवशी परशुराम गोहणे यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण झाले. यावेळी उपाध्यक्ष राजू ढोले, गोविंदराव मोंढे, शंकरराव गोडबोले उपस्थित होते. आभार परमानंद लोणारे यांनी मानले.
रेल्वे मेन्स हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप 
नागपूर - रेल्वे मेन्स हायस्कूलमधील १0 वीच्या विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला. यावेळी आमदार नागो गाणार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका उज्ज्वला अंधारे होत्या. उपमुख्याध्यापक तेलंग, पर्यवेक्षक कावळे, मांढरे, चौधरी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. आ. गाणार यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्या सूचना देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्यांचीही यावेळी भाषणे झाली. शिक्षकांनी परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले. संचालन रश्मी जीवने यांनी तर आभार नेहा लाभे यांनी मानले.
सांदीपनीत पारितोषिक वितरण
नागपूर - सांदीपनी शाळेमध्ये घेण्यात आलेल्या अभ्यासेतर उपक्रमांमधील स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शाळेमध्ये अभ्यासेतर स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांचे चार गट तयार करण्यात आले होते. वर्षभर राबविलेल्या उपक्रमामध्ये निळ्या गटातील मुलांनी बाजी मारली. क्रीडा स्पर्धांमध्येही तेच अव्वल ठरले. निळ्या गटाच्या प्रमुख ऑफिलिया कॅलिब यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. रोमा कपई यांनी पर्यवेक्षिका म्हणून काम पाहिले. प्राचार्य शांती मेनन यांनी सर्वांचे अभिनंदन केले. शाळेच्या अध्यक्ष राजश्री जिचकार, प्रमुख सल्लागार लता थेरगावकर, व्यवस्थापिका मृणालिनी काळे यांनीही सर्वांचे अभिनंदन केले. 

No comments:

Post a Comment