Friday, 9 March 2012

Nagpur Holi


  नव्या कपड्यांसाठी खिसा खाली न करणारा एकमेव सण म्हणजे होळी. काळ्या-गोर्‍या वर्णाचा नव्हे तर गरिबी-श्रीमंतीचाही रंग फिका पडतो शिमग्याच्या उधाणात. कुणाला कोणताही रंग शोभून दिसू शकतो, हाच होळीचा धडा. बुधवारी शहरात ठिकठिकाणी होळी पेटली. धूळवडीच्या पूर्वसंध्येलाच विद्यार्थ्यांनी दफ्तरात लपवून आणलेला रंग मित्रांवर उधळला. व्यापार्‍यांनीही बुधवारी दुकानांच्या परिसरातच धूळवडीचा असा आनंद लुटला.




No comments:

Post a Comment