Wednesday, 18 April 2012

High-Profile Sex Racket In Nagpur सेक्स रॅकेटचे प्रतिष्ठितांना जाळ्यात अडकविण्याचे प्रयत्न

नागपूर शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींना वेगवेगळी आमिषे देऊन 'सेक्स रॅकेटच्या मायाजालात' अडकविण्याचे प्रयत्न हायप्रोफाईल भामट्यांनी सुरू केले आहे. दिल्लीतील बदमाशांची एक टोळी हे काम करीत असल्याची माहिती चौकशीअंती समोर आली आहे. उपराजधानीतील नामवंतांवर या भामट्यांनी आपले जाळे फेकले असून, फसलेल्यांपैकी काहींकडून लाखो रुपये उकळल्याचीही चर्चा आहे.
इंग्रजी, हिंदी, गुजराती, मद्रासी, तेलगू, बंगाली आणि देशातील अन्य भाषा अस्खलित बोलणार्‍या या हायप्रोफाईल भामट्यांनी 'रोयाल इंटरनॅशनल' नामक कंपनीच्या बॅनरखाली आपला गोरखधंदा सुरू केला आहे. देशभरातील विविध महानगरातील गर्भश्रीमंत, उद्योगपती, व्यापारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक तसेच समाजातील सर्वच स्तरातील लब्धप्रतिष्ठितांना त्यांनी आपले टार्गेट केले आहे. या भामट्यांचा त्यांच्या मोबाईलवर मॅसेज येतो. 'मैत्री करा.. मौजमजा करा बिनधास्त.. संपर्क करा..!' खाली मोबाईल क्रमांकही दिलेले असतात. स्वाभाविकपणे खुल्या निमंत्रणाद्वारे वैषयिक भावनांना हवा दिली जात असल्यामुळे काही जण 'त्या' नंबरवर संपर्क करतात. यावेळी संपर्क करणार्‍यांचे नाव, गाव, शिक्षण, व्यवसाय, जीवनमान, छंद आणि वार्षिक उलाढाल याबाबत चौकशी केली जाते. हे सर्व वदवून घेतल्यानंतर 'कैसा माल होना'अशी विचारणा केली जाते. त्यानंतर आमच्या क्लबमध्ये मॉडेल, एअर होस्टेस, फॅशन डिझायनर्स, ज्यांचे पती विदेशात सर्व्हिस करतात किंवा ज्यांचे पती टूरच्या निमित्ताने बाहेर असतात,अशा सर्वच महिला- मुली उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. तुम्ही राहात असलेल्या ठिकाणी किंवा तुम्ही ज्या महानगरात म्हणाल तेथे (तेथील) 'तुम्हाला त्या ललना उपलब्ध होऊ शकतात', असा दावाही केला जातो.
'आपण पुण्यात राहतो', असे सांगितले आणि तेथे कोण आहेत,अशी विचारणा केली तर ते लगेच तुमची बोलणी करून देतो, असे म्हणून फोन कापतात. परत पाच-दहा मिनिटांनी फोन येतो. 'पुणा के ... येरियांमे 'मॅम' रहती है, आपको आज चाहिए तो मिटींग हो सकती है, असे सांगून तिचा 'बायोडाटा'सांगितला जातो. 'गुड लुकिंग है..बडे घर की है.. आप मिटींग करवा लिजीए. सब बढिया है', असे सांगतानाच 'किसी को पता भी नही चलेंगा.. ना आपके वो गले पडेंगी', असा विश्‍वास देऊन आश्‍वस्तही केले जाते. उपराजधानीत अशा प्रकारे अनेकांना मॅसेज आले असून, अनेकांशी विविध ललनांचे मधाळ संभाषणही झाले आहे.
ललनाची सलगी
'तिच्याशी' काही वेळेनंतर बोलणीही करून दिली जातात. पाच दहा मिनिटातच 'कॉन्फरन्सिंग कॉल'वर ती येते. अतिशय मधाळ आवाजात ती तुम्हाला हाय हॅलो करते. तिला आधीच आपल्या नावाची आणि आपल्याला तिची माहिती 'फ्रेण्डस् क्लबवाल्याने' दिली असल्यामुळे एकेरीतच ती आपल्याला साद घालते. अगदी घायाळ हरिणीच्या अविर्भावात मधाळ आवाजात ती सलगी साधते, 'आज मौसम कितना सुहाना है.. बट, बहोत बोर हो रही हू.. क्या शेड्युल्ड है आपका', वगैरे विचारून लगेच 'मै आऊं या आप आओंगे मुझसे मिलने', असा थेट सवालही करते. बराच वेळ कलिजा खलास करणारे संभाषण चालते. नंतर आपल्याला नंबर विचारण्याच्या भानगडीत पडण्याऐवजी स्वत:च 'आप फ्री होणे के बाद तुरंत संपर्क करे.. असे म्हणत आपला मोबाईल नंबर सांगण्याचा प्रयत्न करते. अन्..' कॉन्फरन्सिगवरून तिला कटवले जाते. वो नंबर मै आपको दुंगा.. असे म्हणत हा 'फ्रेण्ड' मुख्य मुद्यावर येतो.
दिल्लीतून होते संचालन
देशभरात मायाजाल पसरलेल्या या रॅकेटचे दिल्लीतून संचालन होते. त्यात केवळ पुरुषच नव्हे तर महिला-मुलींचाही मोठा भरणा असल्याचे जाणवते आहे. लब्धप्रतिष्ठितांना जाळ्यात अडकवले जात असल्यामुळे अनेकदा त्याची हाकबोंबही होत नाही. कुणाला ब्लॅकमेल केले जात असेल तरी लोकलाजेखातर कुणी ओरड अथवा तक्रार करीत नाही 'वन इयर, या लाईफ टाइम
तिच्याशी मिटींग करण्यापूर्वी तुम्हाला आमच्या क्लबची मेंबरशिप मिळवावी लागेल. वर्षभरासाठी १५ हजार तर आयुष्यभरासाठी २५ हजार रुपये जमा केले की 'अशा अनेकींचे तुम्हाला नंबर्स मिळतील', असेही सांगितले जाते.अँक्सिस बँकेचा अकाउंट नंबर दिला जातो. या अकाउंटमध्ये रक्कम भरल्यानंतर लगेच तुमची मिटींग फिक्स करून दिली जाणार असल्याचे वारंवार ठासून सांगितले जाते. पुणे, नागपुरातील अनेक नामवंत आमचे सदस्य असून, त्यांना नियमित सेवा दिली जात असल्याचाही दावा केला जातो.

 News Source: Lokmat http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=21

No comments:

Post a Comment