Friday 8 June 2012

Amravati Ayaush PMT

वैद्यकिय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी मे महिन्यात घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटीच्या परीक्षेत अमरावती येथील ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झालेला आयुष अजयकुमार हेडा याने पीएमटी परीक्षेत विदर्भातून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. त्याला या परीक्षेत २00 पैकी १९५ गुण मिळाले. बारावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण घेणार्‍या आयुषने दहावीच्या परीक्षेतही १00 टक्के गुण मिळविले होते. 
आयुषचे वडील बांधकाम क्षेत्रातील कंत्राटदार असून आई किर्ती गृहीणी आहे. अकोल्याच्या डवरे ज्युनिअर कॉलेजच्या मयूर खोडकेने अभियांत्रिकी सीईटीत १९३ गुणांसह अव्वल स्थान पटकाविले आहे.
विदर्भातून या परीक्षेला एकूण ४८,१४९ विद्यार्थी बसले होते व यातील ६,२९९ विद्यार्थी पात्र ठरले. मात्र विदर्भाच्या निकालाची टक्केवारी ही मराठवाड्याहून कमी ठरली. 
मराठवाडा सरस
यंदा मराठावाडा विभागाने बाजी मारली असून सीईटीचा मराठवाडा पॅर्टन पुढे आणला आहे. आरोग्य विज्ञानमध्ये जालनाच्या जेईएस महाविद्यालयाची माधवी इंदानी (१९८ गुण) पहिली तर अभियांत्रिकीमध्ये पुष्कर नर्सीकर (१९६ गुण) पहिला आला आहे. नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाचा सुमित धुळशेट्टे १९७ गुण मिळवून आरोग्य विज्ञानमध्ये दुसरा तर याच महाविद्यालयाची श्रद्धा सोमानी १९७ गुण मिळवून तिसरी आली आहे. ॅ संबंधित बातमी पान 2 वर निकाल संकेतस्थळावर 
सीईटीचा निकाल विद्यार्थ्यांना उद्या सकाळी ९ वाजल्यापासून www.dmer.org, www.mhtcet2012.org, www.dte.org.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. गुणपत्रिका १४ जूनला महाविद्यालयात मिळणार आहेत.

Check  MHT CET Results

1 comment:

  1. Which is the Best CET, AIEEE, PMT, Karnataka CET Long term Coaching institute in South India, Bangalore?

    ReplyDelete