Thursday, 29 May 2014

Maharashtra HSC 12th Result 2014 - 2 june 2014

राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2014 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 2 जून रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे.
दोन दिवसांपूर्वी बारावीच्या परीक्षेचा निकाल 30 मे रोजी जाहीर होईल अशी अफवा पसरली होती. शिक्षण मंडळाने ही निव्वळ अफवा असून 2 जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याचं स्पष्ट केलंय.
शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या 9 विभागीय मंडळाच्या मदतीने शालान्त परीक्षा घेतली. या परीक्षेसाठी जवळपास 14 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
आता 2 जून रोजी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून सर्व विद्यार्थ्यांना निकालासाठी  बेस्ट ऑफ लक…!
निकाल खालील वेबसाईटवर पाहू शकता
शिक्षण मंडळाची वेबसाईट – https://mahahsscboard.maharashtra.gov.in
http://www.rediff.com/exams

No comments:

Post a Comment