Saturday 29 October 2011

online Nagpur University Exam form ID card



माहिती तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेही एक पाउल पुढे टाकत ऑनलाईन नामांकन (एन्रोलमेंट) सुविधा सुरू केली आहे. 'ई-सुविधा' प्रकल्पांतर्गंत विद्यार्थ्यांना आपले परीक्षा अर्ज ऑन लाईन भरता येणार आहे. तसेच परीक्षेचे ओळखपत्र सुद्घा ऑनलाईन मिळणार आहे. चार लाख विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. विद्यापीठ गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करीत होते. यापूर्वी विद्यार्थ्यांकडून शुल्कही वसूल करण्यात आले होते. परंतु विद्यापीठाला ती सुविधा उपलब्ध करणे शक्य झाले नाही. अखेर यावर्षी मात्र त्यात यश मिळाले आहे.
विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना ही योजना राबविणे बंधनकारक आहे. त्यासंबंधी विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयाला परिपत्रक जारी केले आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात बी. ए. बी.कॉम. आणि बी.एसस्सी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाच या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
विद्यापीठाने २0११-१२ या शैक्षणिक सत्रापासून प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नामांकन सुरू केले आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांला आपला स्वतंत्र युजर आयडी व पासवर्ड तयार करावा लागणार आहे. त्याशिवाय ऑनलाईन परीक्षा अर्ज भरता येणार नाही. विद्यार्थ्यांने ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची एक झेरॉक्स प्रत व परीक्षा शुल्क संबंधित महाविद्यालयाकडे जमा करावे लागेल. त्यानंतर महाविद्यालय ते अर्ज विद्यापीठाकडे पाठवतील. विद्यापीठ त्या अर्जांंची तपासणी करून विद्यार्थ्यांना नामांकन व ओळखपत्र देणार आहे. विद्यार्थ्यांंच्या मोबाईलवरसुद्घा त्यांचा नामांकन आणि ओळख क्रमांक मिळणार आहे. ही योजना यशस्वी राबविण्यासाठी एमकेसीएल प्रत्येक महाविद्यालयात प्रशिक्षण कार्यक्रमसुद्घा राबविणार आहे

No comments:

Post a Comment