Saturday 29 October 2011

We want justice Nagpur: suruchi masale Prashant Kataria's son kidnapped





कुश कटारिया या आठ वर्षीय निष्पाप व निरागस बालकाच्या अपहरण आणि खुनाच्या घटनेने उपराजधानीतील जनमानस ढवळून निघाले. या घटनेला १५ दिवसांचा काळ लोटूनही जनक्षोभ कायम आहे. मारेकर्‍याला फाशी द्या, अशी एकच मागणी केली जात आहे. पोलिसांचा योग्य तपास आणि कायद्याची लढाई यावरच ही जनमागणी अवलंबून असताना आरोपीच्या वकीलपत्रावरून वकिलांमधील किळसवाण्या स्पर्धेची काळी बाजू समाजासमोर आली आहे.
कुशच्या मारेकर्‍याचे वकीलपत्र घेऊ नका असे आवाहन करणार्‍या जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षांनीच या नराधमाचे वकीलपत्र घेतल्याने जनमानसात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक मान्यवर वकिलांनी हा प्रकार घृणास्पद असल्याचे म्हटले आहे.
कुशच्या मारेकर्‍याचे वकीलपत्र कुणी घेऊ नये, असे आवाहन समाजातील विविध मान्यवरांनी केले. एक हजार वकिलांनी तर जिल्हा बार असोसिएशनला तशी विनंती केली. जिल्हा बार असोसिएशनचे सरचिटणीस अँड. मनोज साबळे यांनी जनभावनेचा आदर करीत आपल्या संघटनेच्या वतीने कुशच्या मारेकर्‍याचे वकीलपत्र न घेण्याचे आवाहन केले होते. परंतु संतापाची गोष्ट अशी, बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. सुदीप जयस्वाल यांनीच आरोपीचे वकीलपत्र घेतले. त्यांनी वकीलपत्र घेणे, हे नियमबाह्य नाही.परंतु सुरुवातीला संघटनेने आवाहन करायचे आणि नंतर संघटनेच्याच अध्यक्षाने वकीलपत्र घ्यायचे,या गोष्टी सार्वजनिक जीवनात 'संशयास्पद वर्तनात' मोडल्या जातात. यापूर्वी अँड.जयस्वाल यांनी हरेकृष्ण ठकराल अपहरण व खून प्रकरणातील आरोपींची बाजू मांडली होती. अख्खा महाराष्ट्र ढवळून निघालेल्या खैरलांजी हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील होते.
पूर्व नागपुरातील हिवरीनगर येथील सुरुची मसाले कंपनीचे संचालक राजू कटारिया यांचा मुलगा कुश याचे त्यांच्या घरासमोर राहणार्‍या आयुष पुगलिया (२२) या युवकाने ११ ऑक्टोबर २0११ रोजी अपहरण केले.क्रिकेट सट्टय़ात बरबाद झालेल्या आयुषने कुशला सूर्यनगर परिसरात नेऊन त्याचा निर्घृण खून केला.त्याने दोन कोटी रुपयांची खंडणीही मागितली.पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आणि नराधम आयुष याला फाशीच झाली पाहिजे, अशी जनभावना व्यक्त होऊलागली.
हत्याकांड उजेडात येण्यापूर्वी कुशच्या अपहरणाच्या घटनेनंतर संशयित म्हणून अटकेत असलेल्या आयुष पुगलिया याचे वकीलपत्र अँड. प्रकाश जयस्वाल यांनी घेतले होते. परंतु आयुषच खरा नराधम असल्याचे उजेडात येताच त्याच्या घृणित कृत्याचा पुरस्कार नको म्हणून त्यांनी आरोपीचे वकीलपत्र तत्काळ धुडकावून आपणही याच समाजाचा एक घटक आहोत याची जाणीव करून दिली. एवढय़ावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी या नराधमाचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये यासाठी सह्यांची मोहीमही राबविली.
आरोपी आयुषचे वकीलपत्र घेण्यावरून वकिलांमध्ये मोठा वाद उफाळून आला. कोणत्याही आरोपीला न्यायापासून वंचित ठेवणे हे वकिली व्यवसाय संहितेच्या विरुद्ध आहे. कायदा हा कायद्याप्रमाणेच आपले काम करतो, असे मत काही वकिलांनी व्यक्त केले. कुश हा श्रीमंत कुटुंबातील होता. तो गरीब कुटुंबातील असता तर वकील त्याच्या बाजूने उभे राहिले असते काय, असा प्रश्नही याच विचारसरणीच्या वकिलांनी व्यक्त केला आहे.
ज्यांना स्वत:चा वकील लावण्याची ऐपत नाही किंवा ज्या आरोपीविरुद्ध अख्खा समाज उभा होतो, अशांना खुद्द न्यायालयच 'लिगल एड'मार्फत वकील नेमतात. मुंबई बॉम्बस्फोटातील अजमल कसाबला न्यायालयानेच वकील नेमून दिला होता. जेथे जनभावनेचा प्रश्न निर्माण होतो तेथे मुद्दाम आरोपीचे वकीलपत्र स्वीकारणे योग्य आहे काय? स्वत:च्या प्रसिद्धीसाठी आणि आरोपी हा गडगंज श्रीमंत असल्याने तगड्या 'फी'साठी तर हे वकीलपत्र स्वीकारले गेले नाही ना, अशीही चर्चा आता उघडपणे सुरूआहे. कुश याच्या निर्घृण हत्येने वकिलांमधील जीवघेण्या स्पर्धेची काळी बाजू समाजासमोर आली आहे. ही स्पर्धा केवळ जीवघेणी नाही, ती किळस आणणारी आहे. वकिलांबद्दल समाजात अजूनही कायम असलेला विश्‍वास नष्ट करणारी आहे. कुठल्याही आरोपीचे वकीलपत्र खुशाल घ्या. पण पैसा आणि प्रसिद्धी मिळते म्हणून स्वार्थासाठी या चिमुकल्याच्या मृत्यूचे भांडवल करू नका. तुम्हालाही मुले आहेत. पोटचा गोळा गमावण्याचं दु:ख काय असू शकते, हे या वकिलांना कसे कळणार?
मी आरोपीचे वकीलपत्र स्वीकारून वकिली व्यवसाय संहितेचे पालन केले आहे. मी आरोपपत्र घेऊ नका, असे कधीही आवाहन केले नाही. जरी मी संघटनेचा अध्यक्ष असलो तरी वकील म्हणून वैयक्तिकरीत्या मी आरोपीचे वकीलपत्र घेतले आहे. 

No comments:

Post a Comment