Tuesday 21 February 2012

Nagpur LAD Collage students achievements

एलएडी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे सुयश
नागपूर- एलएडी महाविद्यालयाचा डिपार्टमेंट ऑफ कॉस्मेटिक अँड टेक्नॉलॉजी विभाग आणि श्रीमती आर.पी. कॉलेज फॉर वुमेन, सेमिनरी हिल्स येथील पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थिनी निरजा दिलीप गाठे आणि ऋतुजा विंचुर्णे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे वर्धा येथे आयोजित अविष्कार रिसर्च फेस्टिव्हल २0११-१२ मध्ये पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रथम पुरस्कार पटकाविला आहे. राज्यस्तरावर कोल्हापूर येथे आयोजित स्पर्धेत या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. याच विभागातील रोशनी राज आणि अपर्णा माताडे यांनी येथील पोस्टर प्रझेंटेशनमध्ये द्वितीय स्थान प्राप्त केले. प्राचार्या डॉ. शामला नायर, विभाग प्रमुख डॉ. शीला कुळकर्णी, डॉ. संगीता सहस्त्रबुद्धे, डॉ. निभा बाजपेयी यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे विद्यार्थिनींनी हे सुयश संपादन केले आहे.

गरीब ऑटोचालकाच्या मदतीसाठी पुढाकार
नागपूर- महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्तीय विकास महामंडळातर्फे चालविण्यात येणार्‍या अर्थसाहाय्य बीज भांडवल योजनेंतर्गत नागपूर जिल्हा ऑटोचालक-मालक संघाचे सभासद चरणदास वानखेडे यांना महात्मा फुले विकास महामंडळ आणि बँक ऑफ बडोदा शाखा लक्ष्मीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन ऑटोरिक्षा खरेदी करण्याकरिता अर्थसाहाय्य करण्यात आले. महामंडळाच्या पंचशील चौकस्थित कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक प्रशांत गेडाम व जिल्हा व्यवस्थापक चंद्रपाल सोनटक्के यांच्या हस्ते ऑटोरिक्षाची चाबी व कागदपत्रे वानखेडे यांना देण्यात आली. बँकेचे शाखा व्यवस्थापक हेडाऊ, कर्ज अधिकारी अजय सुटे यांनी यासाठी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाला महामंडळाचे सहायक लेखा अधिकारी सिद्धार्थ खोब्रागडे, नागपूर जिल्हा ऑटोचालक-मालक महासंघाचे हरीशचंद्र पवार, कैलाश श्रीपतवार, मोहन बावने, अजय उके उपस्थित होते. 
अरबा संस्थेतर्फे पोलिओ अभियान
नागपूर-अरबा बहुउद्देशीय संस्था या स्वयंसेवी संस्थेने पोलिओ अभियानात सक्रिय सहभाग घेऊन पोलिओमुक्तीकरिता प्रचार केला. संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद आतिक खान यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. असलम बारी, सचिव हाजी एम.ए. रफी यांनी अनेक वस्त्यांमध्ये जाऊन शून्य ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओ खुराक देण्याबाबत जनजागृती केली. संघटनेचे सर्व सदस्य या मोहिमेत सहभागी झाले. 
श्री महालक्ष्मी सामाजिक संस्थेतर्फे पोलिओ अभियान
नागपूर- बाबा फरीद नगर येथील श्री महालक्ष्मी सामाजिक संस्थेच्या वतीने प्रभाग क्र. ६ चे नवनिर्वाचित नगरसेवक अरुणभाऊ डवरे, संगीता गिर्‍हे यांच्या हस्ते शून्य ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओ ड्रॉप देऊन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या केंद्रावरून सुमारे ५00 बालकांना पोलिओ ड्रॉप पाजण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष संजय केदार, डॉ. मधुसूदन मैंद, भाऊराव केदार, स्वप्नील पातोडे, भीमराव काळबांडे, संदीप कैथवास, पडगीलवार, धर्मेंद्र ब्रह्मवंशी, बंडू वैद्य यांचेसह सर्व सदस्यांनी अभियानाच्या यशस्वितेकरिता परिश्रम घेतले.
कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे २८ ला देशव्यापी बंद
नागपूर- कामगार संघटना संयुक्त कृती समिती अंतर्गत देशातील सर्व कामगार संघटनांनी २८ फेब्रुवारी रोजी भारत बंदचा नारा दिलेला आहे. सर्व पंजीकृत संघटनांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारला संपाची नोटीस देण्यात आली असून या बंदच्या तयारीकरिता सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक भारतीय मजदूर संघाच्या काँग्रेस नगर कार्यालयात झाली. या बैठकीला एआयटीयुसीचे मोहनदास नायडू, मोहन शर्मा, सीटूचे अमृत मेश्राम, आसई, भामसंचे श्रीराम बाटवे, विनायक जोशी, एलआयसी संघटनेचे अतुल देशपांडे, एनओबीडब्ल्यूचे राजीव पांडे, प्रकाश वणीकर, बीईएफआयचे नंदनवार, राज्य कर्मचारी संघटनेचे दगडे, गजानन गटलेवार, अशोक भोसले व अनेक संघटनांचे नेते उपस्थित होते. समितीतर्फे २३ ला पत्रकार संघाच्या सभागृहात सायंकाळी ५.३0 वाजता कामगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच २७ ला रिझर्व्ह बँक चौकातून रॅली व धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


News Source: http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?

No comments:

Post a Comment