Tuesday 21 February 2012

Nagpur Tulsiram Gaikwad Patil College Nagpur collage school news

तुळशीराम गायकवाड-पाटील कॉलेज
नागपूर- तुळशीराम गायकवाड-पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या वतीने अलीकडेच दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. गायकवाड-पाटील समूहाचे प्रमुख प्रा. मोहन गायकवाड यांच्या हस्ते उद््घाटन झाले. अतिथी म्हणून संस्थेचे व्यवस्थापक एस.एन. बागची, प्रा. शरद पाटील, प्राचार्य डॉ. जी. के. आवारी उपस्थित होते. कार्यशाळेत प्रा. अभय देशपांडे यांनी पी.सी.बी. डिझायनिंग आणि प्रोजेक्ट तयार करणे यावर मार्गदर्शन केले. तसेच सोल्डरिंग, आयर्निंग, इचिंग, टेस्टिंग आणि ड्रिलिंग तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. शेवटी मोहन गायकवाड आणि प्राचार्य डॉ. आवारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले. 



















तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय 
नागपूर - तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयात अलीकडेच वैद्यकीय मनोचिकित्सा सामाजिक कार्य प्रशिक्षणाचा समारोप समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. के. एस. पाटील होते. अतिथी म्हणून मेडिकल कॉलेजचे प्रा. डॉ. अरुण हुमणे, बालरोगतज्ज्ञ डॉ. शरयू हुमणे, डॉ. प्रगती अग्रवाल, प्रा. स्वाती धर्माधिकारी व प्रा. मीनाक्षी गणवीर उपस्थित होते. यावेळी डॉ. हुमणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, रोग आणि रुग्ण दोन वेगवेगळे घटक आहेत. डॉक्टर रोगाचे निदान व उपचार करतात पण रुग्णांच्या सामाजिक, भावनात्मक, आर्थिक व मानसिक गरजांची पूर्तता केवळ सामाजिक कार्यकर्तेच करू शकतात. संचालन शीतल बरडे व डॉली यांनी आभार मानले. 
अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय 
नागपूर - अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या समितीची अलीकडेच सभा झाली. अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागप्रमुख डॉ. प्रमोद कोठीवाले होते. सभेला माजी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थी शुभेंदू, प्रा. वाकोडे, प्रा. सोनल व प्रा. मनीषा यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. कोठीवाले आणि प्राचार्य डॉ. देवेंद्र मोहतुरे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंजूषा ठाकरे यांनी केले. जावेद मलिक यांनी आभार मानले. 
सिंधू महाविद्यालय 
नागपूर - सिंधू महाविद्यालयात वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने अलीकडेच कार्यशाळा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांना रहदारीचे नियम आणि शिस्तीचे धडे देण्यात आले. पोलीस निरीक्षक बी.एन. भोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
एएसआय एम.एस. ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम सांगून, परवान्याशिवाय वाहन चालवू नये, असा सल्ला दिला. तसेच वाहतूक पोलिसांना सहकार्य करून नियमांचे पालन करा, असेही त्यांनी आवाहन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रवीण जोशी यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. संचालन श्‍वेता गोयल यांनी केले. मनोरंजन झा यांनी आभार मानले. 
सी.पी. अँण्ड बेरार महाविद्यालय 
नागपूर - सी.पी. अँण्ड बेरार महाविद्यालयात अलीकडेच स्व. अँड. विष्णू उपाख्य बापूसाहेब खरे स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अँड. अशोक बनसोड होते. अतिथी म्हणून आ. नागो गाणार व आशुतोष अलोणी उपस्थित होते. यावेळी अलोणी यांनी सामान्य माणूस हाच देशाचा खरा आधार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, सामान्य माणसानेच देशाच्या इतिहासाला वळण लावले असून त्यामुळे मूल्ये आणि जीवनपद्घती टिकून आहे. त्यांनी इतिहास घडविला, याची जगाचा इतिहास साक्ष देत असल्याचेही ते म्हणाले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मिलिंद बाराहाते यांनी केले. संचालन प्रा.विभा क्षीरसागर यांनी केले. प्रा.अजय कुळकर्णी यांनी आभार मानले. 
के.आर. पांडव महाविद्यालय 
नागपूर - के.आर. पांडव महाविद्यालयाच्या वतीने आयोजित 'कॉन्कर्ड-२0१२' आंतरमहाविद्यालयीन स्नेहसंमेलनाचा पुरस्कार वितरण सोहळा अलीकडेच पार पडला. कार्यक्रमाला अतिथी म्हणून डॉ. के.सी. देशमुख, डॉ. एन.एस. भावे, विद्यापीठाचे सिनेट सदस्य रितेश गाणार, डॉ. व्ही.के. माटे, डॉ. पी.एस. चरपे उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम व पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी विवेक कटारे, स्मिता मुळे, प्रद्माकर बडगे उपस्थित होते.



No comments:

Post a Comment