Saturday 26 May 2012

Once again Girls Top in HSC Nagpur 2012

बारावी परीक्षेत मुलींनी मुलांपेक्षा अधिक धवल यश संपादन केले, याचा आनंद आहे. गेल्या वर्षी लातूर, औरंगाबाद, अमरावती या विभागांमध्ये कॉपीमुक्त अभियानामुळे निकाल कमी लागला होता. तेथे यंदा निकालात लक्षणीय सुधारणा झाली. याचा अर्थ कॉपीमुक्त अभियान तर १00 टक्के यशस्वी झालेच; शिवाय विद्यार्थी आणि शिक्षकांची बांधिलकी वाढली ही सुखद बाब आहे. चारही शाखांच्या निकालात झालेली वाढ हे खर्‍या अर्थाने चौफेर यश म्हणावे लागेल. दमदार यशाबद्दल मी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो.


राजेंद्र दर्डा
शालेय शिक्षण मंत्री नागपूर। दि.२५( प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाची स्नेहल ईश्‍वर कोसे हिने ९८.१६ (५८९) टक्के गुण मिळून विदर्भात पहिले स्थान पटकाविले आहे. तिला गणित, भौतिकशास्त्र आणि रसायसशास्त्र या विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. 
स्नेहलपाठोपाठ वर्धा येथील जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयाची रसिका अजय चौधरी हिने ९७.८३ (५८७) टक्के गुण मिळविले. ही विदर्भात (पान २ वर) बारावी परीक्षेत मुलींनी मुलांपेक्षा अधिक धवल यश संपादन केले, याचा आनंद आहे. गेल्या वर्षी लातूर, औरंगाबाद, अमरावती या विभागांमध्ये कॉपीमुक्त अभियानामुळे निकाल कमी लागला होता. तेथे यंदा निकालात लक्षणीय सुधारणा झाली. याचा अर्थ कॉपीमुक्त अभियान तर १00 टक्के यशस्वी झालेच; शिवाय विद्यार्थी आणि शिक्षकांची बांधिलकी वाढली ही सुखद बाब आहे. चारही शाखांच्या निकालात झालेली वाढ हे खर्‍या अर्थाने चौफेर यश म्हणावे लागेल. दमदार यशाबद्दल मी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो.
- राजेंद्र दर्डा

No comments:

Post a Comment